Devendra Fadanvis
Devendra FadanvisDevendra Fadanvis

त्याचवेळी आंदोलन थांबणार; टेंभूर्णीत फडणवीसांचा हल्लाबोल

जागर शेतकऱ्यांचा; आक्रोश महाराष्ट्राचा’ या अभियानाच्या सांगता समारोप प्रसंगी ते बोलत होते.

टेंभुर्णी : शेतकरीविरोधी सरकारला आम्ही आग लावू आणि त्या सरकारचे विसर्जन करू त्याचवेळी खऱ्या अर्थाने आमचे आंदोलन थांबेल, असा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी जागर यात्रेचा आज समारोप होत असला तरी आंदोलनाचा समारोप आज होणार नाही. ‘जागर शेतकऱ्यांचा; आक्रोश महाराष्ट्राचा’ या अभियानाच्या सांगता समारोपाची सभा टेंभुर्णी येथे पार पडली त्यावेळी फडणवीस बोलत होते. (Devendra Fadavsi Tembhurni Sabha)

Devendra Fadanvis
इतक्या वर्षांनी शरद पवारांना ब्राम्हण समाजाची आठवण आली; फडणवीसांचा हल्ला

मी मुख्यमंत्री असताना पाच वर्षांत एकदाही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू दिलं नाही. वीज कंपन्या तोट्यात जातात; म्हणून राज्य सरकारतर्फे अनुदान दिले. मात्र एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापू दिलं नाही. मात्र, तीस लाख शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्याचे महापाप या महावसुली सरकारने केल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

Devendra Fadanvis
मंकीपॉक्स: वाढत्या रूग्णसंख्येनंतर केंद्राचे महत्त्वाचे आदेश

आम्ही विधासभा चालू दिली नाही, तेव्हा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती देण्यात आली. मग हे सरकार कशाच्या जीवावर शेकऱ्यांचे कैवारी असल्याचे सांगत आहे, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित करत शेतकऱ्याची दैना या सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. षडयंत्र करून शेतकऱ्यांचे कारखाना बुडविण्यात आले आहेत आणि हजारो कोटींचे कारखाने कवडीमोल किमतीने विकत घेतले जात आहेत. शेतकरी मेला काय राहिला काय, याच्याशी सरकारला काही देणं घेणं नाही.

Devendra Fadanvis
आरक्षण : ओबीसी आयोगाचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मशाल पेटविली आहे. ही मशाल तेव्हाच विझेल, ज्यावेळी या शेतकरीविरोधी सरकारला आम्ही आग लावू आणि या सरकारचे विसर्जन करू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उजनी बांधताना या धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्याला मिळेल. तसेच, बॅक वॉटर दुष्काळग्रस्त गावांना मिळेल, असे सांगितले हेाते. मात्र, आता या पाण्यावर काही लोकांची नजर गेली आहे. हे पाणी पळविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला असल्याचे फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com