मुख्यमंत्री आषाढी पुजेला येणार नाहीत; गिरीश महाजनांची माहिती

रविवार, 22 जुलै 2018

पंढरपूर- मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. पंढरपूर आषाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जक्का जाम अांदोलन सूरू असून मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पुजा करु देणार नाही असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत असून त्यासाठी आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल अशी माहिती महाजन यांनी दिली.

...तर मंत्रीपदाचा राजीनामा देणार
पंढरपूरला जाताना माचणूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेतली. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आंदोलकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत फोनद्वारे बोलणे करून दिले. पुढील आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मंत्री पदाचा राजीनामा देईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: devendra fadanvis cancelled pandharpur ashadhi visit