फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लगाम घालावा; नाना पटोलेंची मागणी

राजकारण बाजूला ठेवून या घटनेकडे गंभीरतेने सर्व पक्षांनी पाहणे अतिशय आवश्यक आहे.
Nana Patole Devendra Fadnavis
Nana Patole Devendra Fadnavise sakal

मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात निदर्शनं करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या (BJP) पुरुष कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण निंदनीय आहे, असे मत काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले आहे. प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सीतेविषयीदेखील आदर निर्माण करणे गरजेचे आहे. (Nana Patole Reaction On NCP-BJP Supporters Fight)

राजकारण बाजूला ठेवून या घटनेकडे गंभीरतेने सर्व पक्षांनी पाहणे अतिशय आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घालावी, अशी मागणीदेखील पटोले यांनी केली आहे. या घटनेची चौकशी करत दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, हीच आमची मागणी असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

Nana Patole Devendra Fadnavis
भारताचा घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर; 9 वर्षातील उच्चांक

प्रकरण नेमकं काय?

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी (Minister Smriti Irani) अमित शाह (Amit Shah) यांच्या आयुष्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी काल पुण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महागाईविरोधात जोरदार (Inflation Protest) आंदोलन केले. यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गोंधळ निर्माण झाला. यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाणही करण्यात आली. या घटनेनंतर अनेक स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Nana Patole Devendra Fadnavis
राज ठाकरे पुण्यात पोहोचण्याआधीच सभेची तारीख जाहीर

राड्यावर गृहमंत्र्यांची भूमिका

दरम्यान, या घटनेवर राज्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "चूक कोणाची आहे, त्याप्रमाणे जर राष्ट्रवादीची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील आणि भाजपाची असेल तर, त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील असे ते म्हणाले. भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही आक्षेपार्ह बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई अभिप्रेत आहे ती कारवाई होईल".

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com