esakal | सरकारची विश्वासार्हता संपली; आरोप करणारे परमबीर सिंग पहिले नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis said Parambir Singh is not the first to make the allegation Nagpur news

जयस्वाल यांची बदली झाली नाही. तरीही त्यांनी आरोप केले. फक्त सरकारला वाचविण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार काहीही का बोलत नाही. फक्त परमबीर सिंगची चौकशी होणार का? की आणखी सत्‍य बाहेर आणले जाईल असेही फडणवीस म्हणाले.

सरकारची विश्वासार्हता संपली; आरोप करणारे परमबीर सिंग पहिले नाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला. राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. बदली झाली म्हणून त्यांनी हा आरोप केला नाही. आरोप करणारे ते पहिले नाही. सुबोध जयस्वाल यांनीही आरोप केले होते. मात्र, याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत तसेच आरोपाची जबाबदारी निश्चित होईपर्यंत आंदोलन केले जाईल, असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे असा लेटरबॉंब परमबीर सिंह यांनी फोडला आहे. गृहमंत्र्यांवर येवढे गंभीर आरोप झाले असताना त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. पदावरच्या गृहमंत्र्यांची चौकशी कशी होणार? पदावरील व्यक्तीची चौकशी होऊच शकत नाही. अगोदर राजीनामा घ्या नंतर चौकशी करा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिक माहितीसाठी - आता १ नव्हे तर ४ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने; सोमवारपासून होणार पुढील बदल

आरोप करणारे परमबीर सिंग पहिले नाही. सुबोध जयस्वाल यांनीही यापूर्वी आरोप केले होते. यापूर्वीही बदल्यांचे रॅकेट समोर आले होते. मात्र, जयस्वालच्या अहवालावर कारवाई झाली नाही. रश्मी शुक्ला यांनीही त्यावेळी अहवाल दिला होता. केवळ तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यावेळी काही फोन टॅप झाले होते. या फोन रेकॉर्डिंगद्वारे अहवाल दिला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

जयस्वाल यांची बदली झाली नाही. तरीही त्यांनी आरोप केले. फक्त सरकारला वाचविण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार काहीही का बोलत नाही. फक्त परमबीर सिंगची चौकशी होणार का? की आणखी सत्‍य बाहेर आणले जाईल असेही फडणवीस म्हणाले.

गृहखात कोण चालवतं?

महाविकासआघाडीमधील गृहखात कोण चालवत हा प्रश्न आहे. सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवसेनेचे अनिल परबच उत्तर देत होते. यामुळे गृहखात अनिल देशमुख चालवते की शिवसेना असा प्रश्न निर्माण होतो.

जाणून घ्या - तुम्ही मच्छरांमुळे त्रस्त झाले आहात? मग घरी ही झाडे लावा आणि डासांना पळवा

भाजपने आंदेलन सुरू राहील

या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत आणि आरोप निश्चित होईपर्यंत भाजप आंदोलन करीत राहील. याची घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय चौकशी पूर्ण होऊ शकत नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

loading image
go to top