Maratha Reservation : संभाजीराजेंनी सरकारची बाजू चांगल्या पद्धतीने मांडली!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

''मराठा आरक्षणाच्या मोर्चावेळी खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारची भुमिका चांगल्या पद्धतीने मांडली. त्यामुळे मोर्चा शांतपणे संपला,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले. 

मुंबई: ''मराठा आरक्षणाच्या मोर्चावेळी खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारची भुमिका चांगल्या पद्धतीने मांडली. त्यामुळे मोर्चा शांतपणे संपला,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले. 

आज उच्च् न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतिम निकाल देताना ते वैध ठरवले. त्यानंतर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालाचे स्वागत केले. तसेच आरक्षणासाठी मदत करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले.

राज्य मागासवर्ग आयोगाने कमी वेळात अहवाल दिल्यानेच हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. खासदार संभाजराजे यांचा आवर्जुन उल्लेख त्यांनी केला. त्यांनी सरकारची बाजू व्यवस्थित मांडल्यामुळे मुंबईचा मोर्चा शांतपणे संपला, असेही फडणवीस म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadavnis thanks to sambhajiraje for well present government side