फडणवीस सरकारची 3 वर्षे: महाराष्ट्राचा कल काय ?

सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला 3 वर्ष पुर्ण होत असताना राज्यातील जनतेचा कल जाणुन घेण्यासाठी सकाळ माध्यम समुहाने राज्यव्यापी सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 288 मतदार संघातील जनतेचा कल समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुंबई - राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला 3 वर्ष पुर्ण होत असताना राज्यातील जनतेचा कल जाणुन घेण्यासाठी सकाळ माध्यम समुहाने राज्यव्यापी सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 288 मतदार संघातील जनतेचा कल समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

या सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांवर साम मराठी वर आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत जलसंधारण मंत्री राम शिंदे, शिवसेना आमदार निलम गोऱ्हे, काँग्रेस नेते भाई जगताप, भाजप नेते माधव भंडारी, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील या राजकीय नेत्यांसह सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांचा सहभाग होता. 

संपूर्ण चर्चा इथे पाहा:

काय आहे कल महाराष्ट्राचा ?

 • 27 % जनतेच्या मते शेतकरी कर्जमाफीचा राज्याला सर्वाधिक फायदा
 • 24 % लोकांना वाटतं, शिष्यवृत्ती योजनेचा राज्याला सर्वाधिक फायदा
 • 57 % लोकांच्या मते नोटाबंदी-जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
 • 18 % लोकांच्या मते नोटाबंदी,GST चा अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही
 • 15 % लोकांच्या मते सरकारला महागाई रोखण्यात यश
 • 59 % लोकांच्या मते सरकारला महागाई रोखण्यात अपयश

चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे

 • कामगार, शेतमजुरांमध्ये सरकारविषयी भीती - जयंत पाटील
 • सरकारला लोकं घाबरतात, सरकारचा धाक वाढलाय- जयंत पाटील
 • 3 वर्षात सरकारनं घोषणा, आवेशपूर्ण भाषणं केली - जयंत पाटील
 • विरोधी पक्षांच्या कामगिरीवर 21 % लोक समाधानी,विरोधी पक्षांच्या कामगिरीवर 56 % लोक नाराज, सामाजिक वातावरण गढूळ झालं - निलम गोऱ्हे
 • विदर्भ, मराठवाड्यात गुंतवणूक जातेय का ? - जयंत पाटील
 • विरोधकांकडून अजूनही ठाम भूमिका नाही- श्रीराम पवार
 • विरोधकांची नैसर्गिक जागा शिवसेना भरुन काढतेय - श्रीराम पवार
 • मंत्र्यांना नाहक टार्गेट करणारी विरोधकांची आंदोलनं -निलम गोऱ्हे
Web Title: devendra fadnavis 3 years report card Marathi news Sakal Survey Saam TV