बाळासाहेबांमुळे ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे गणेशपूजनाने उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे गणेशपूजनाने उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज (ता. 23) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौर बंगल्यावर त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. युतीत बेबनाव झाला असताना या दोन्ही नेत्यांचे एकत्र येणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुकीपूर्वी हे दोन्ही नेते एकत्र आल्याने युती होणार की नाही या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावे अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा होती; मात्र, पंतप्रधान या महिन्याभरात मुंबईत येण्याची शक्‍यता कमी असल्याने भूमिपूजनाऐवजी गणेशपूजन करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उपस्थित होते. स्मारकाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे स्वत: निर्णय घेणार आहेत.

Web Title: devendra fadnavis and uddhav thackeray again together due to Balasaheb Thackeray