रिक्त ७२ हजार जागा भरणार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - राज्यातील विविध विभागांत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यातील ७२ हजार जागा भरण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. 

मुंबई - राज्यातील विविध विभागांत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यातील ७२ हजार जागा भरण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. 

विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारकडून कृषी विभाग २ हजार ५७२, पशू व दुग्धसंवर्धन विभागातील १ हजार ४७ मत्स्यव्यवसाय विभाग ९०, ग्रामविकास विभाग ११ हजार ५००, गृह विभाग ७ हजार १११, सार्वजनिक बांधकाम विभाग ८ हजार ३३७, जलसंपदा विभाग ८ हजार २२७, जलसंधारण विभाग ४ हजार २२३, सार्वजनिक आरोग्य विभाग एक हजार आणि नगरविकास विभागाच्या १ हजार ५०० जागा अशा एकूण ३६ हजार रिक्त जागा यावर्षी भरल्या जातील आणि उर्वरित ३६ हजार जागा पुढील वर्षी भरल्या जातील. 

पुन्हा मंत्र्यांना क्‍लीन चिट
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील बंगला, संभाजी पाटील-निलंगेकर यांना कर्जातून सूट देणे, औद्योगिकमंत्री सुभाष देसाई यांचे औद्योगिक जमीन गैर अधिसूचित करणे यासंबंधी विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांनाही क्‍लीन चिट दिली. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांची लोकायुक्तांकडून चौकशी सुरू असून, लवकरच त्याचा अहवाल येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Devendra Fadnavis The announcement of paying 72 thousand seats in the state vacancies