'युतीबद्दल...', सत्तारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray
Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeraye sakal

मुंबई : देशभरात नितीन गडकरींची (Union Minister Nitin Gadkari) ख्याती पूल बांधणारे मंत्री म्हणून आहे. हेच नितीन गडकरी शिवसेना आणि भाजपमधील युतीचा (BJP-Shivsena Alliance) पूल बांधू शकतात, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार (Shivsena Leader Abdul Sattar) यांनी केलं होतं. त्यावरूनच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सत्तारांना टोला लगावला आहे.

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray
मला रात्री झोप येत नाही, युवा पिढीची चिंता - फडणवीस

युतीबद्दल फडणवीस काय म्हणाले? -

मला अतिशय आनंद आहे, की नितीनजी शिवसेना-भाजपची युती करू शकतात, असं अब्दुल सत्तारांना वाटतं. कारण, नितीनजी आमचे मोठे नेते आहेत. पण, अब्दुल सत्तार नया हैं वह, असा टोला फडणवीसांनी लगावला. तसेच त्यांनी सत्तारांवर टीका देखील केली. सत्तारांना शिवसेनेबद्दल काय माहिती आहे? त्यांना काहीच माहिती नाही. ते कधी गेल्या पाच सात महिन्यात उद्धवजींना तरी भेटले आहेत का? युतीबद्दल बोलायला महत्वाचा माणूस लागतो, असंही फडणवीस म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ''राज्यात हे सरकार फार काळ टिकणार नाही. अडीच वर्षे होताच भाजप-शिवसेना पुन्हा जवळ येतील. राज्यात कोणतंही परिवर्तन घडवायचं असेल त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी आहेत. त्यांचे विरोधकांसोबत देखील चांगले संबंध आहेत. गडकरी हे राजकारणातील विद्यापीठ आहेत. त्यांचे आणि उद्धव ठाकरेंचे जुने संबंध आहेत. मात्र, राज्यातील भाजप नेत्यांच्या राजकारणामुळे गडकरी राजकारणात लक्ष देत नाहीत. भाजप आणि युतीचा पूल बांधायचा असेल तर ते फक्त गडकरीच करू शकतात. परंतु, युतीचा निर्णय शेवटी उद्धव ठाकरेच घेतील'', असं वक्तव्य सत्तार यांनी केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com