Devendra Fadnavis : 'मी सावरकर' देवेंद्र फडणवीसांनी बदललं प्रोफाईल पिक्चर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis News

Devendra Fadnavis : 'मी सावरकर' देवेंद्र फडणवीसांनी बदललं प्रोफाईल पिक्चर

मुंबईः भाजप आणि शिवसेनेच्या वतीने राज्यामध्ये 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या विधानानंतर देशभर वातावरण तापलेलं आहे. त्यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी सावरकर' असं प्रोफाईल ठेवलंय.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर 'मी सावरकर' असं लिहिलेलं आणि सावरकरांचं चित्र असलेला फोटो प्रोफाईलला ठेवला आहे. हॅशटॅग देत न्यू प्रोफाईल पिक्चर असं त्यांनी नमूद केलं आहे. मागील काही दिवसांपासून सावरकरांवरुन वादंग उठलेलं असतांना फडणवीसांनी एक मोहीम सुरु केल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचाः जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांनी थेट सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या विधानानंतर देशभर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. महाराष्ट्रातदेखील सत्तापक्षाने राहुल गांधींचा निषेध केला.

काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यामध्ये 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याच अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर 'मी सावरकर' हे प्रोफाईल ठेवलं आहे. मोहिमेचा भाग म्हणून इतर भाजप आणि शिवसेनेचे नेते हेच प्रोफाईल ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.