'रात्रीपर्यंत भाजपचाच मुख्यमंत्री होणार'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसतानाच कितीही हालचाली झाल्या तरी आज रात्रीपर्यंत राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल आणि ते देवेंद्र फडणवीसच असतील, असा विश्वास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसतानाच कितीही हालचाली झाल्या तरी आज रात्रीपर्यंत राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल आणि ते देवेंद्र फडणवीसच असतील, असा विश्वास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नवनीत कौर राणा म्हणाल्या, 'महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, विकासाच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. आज सायंकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल' थोडी वेळ इकडे तिकडे होईल मात्र मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस हेच बसतील, असा विश्वासदेखील नवनीत कौर राणा यांनी बोलून दाखवला.

राष्ट्रावदीचे नेतेही सत्तास्थापनेसाठी राजभवनाला येणार?

पोरं ही पोरंच असतात, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. शिवसेना आणि राष्ट्र्वादी-काँग्रेसचे सरकार येणार कशी? त्यांना एक दिवसाचा वेळ दिला आहे. त्यांच्याकडे बहुमत असेल ते त्यांनी करावं, मात्र असं होणार नाही. संध्याकाळपर्यंत याबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याचे देखिल त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री?

भाजपचा मुख्यमंत्री होणे ही जनतेसाठी चांगली गोष्ट आहे. कारण केंद्रात आमची सत्ता आहे जर राज्यात आमची सत्ता असेल तर जनतेची कामं होतील. दोन्हीकडून बरोबरीचे सहकार्य मिळाले तर विकास होईल, म्हणून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी बसले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis for maharashtra chief minister says MP navneet rana