फडणवीस सरकार: अपेक्षापूर्तीची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचा विस्तार, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी काळात पूर्ण करणार आहोत. राज्यातील बहुतांश शहरातील पायाभूत सुविधा भक्कम करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शाश्वत शेतीवर भर, याला आगामी दोन वर्षांत राज्य सरकारचे प्राधान्य असेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस सरकारने सुरु केलेली वाटचाल आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचली आहे. वाटचालीच्या या टप्प्यावर महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षा आहे ती अपेक्षापूर्तीच्या प्रत्यक्ष अनुभवाची. फडणवीस सरकारने यापुढच्या काळातही रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा बळकट करण्याला प्राधान्य द्यावे, असे राज्यातल्या जनतेला वाटते.

राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचा विस्तार, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी काळात पूर्ण करणार आहोत. राज्यातील बहुतांश शहरातील पायाभूत सुविधा भक्कम करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शाश्वत शेतीवर भर, याला आगामी दोन वर्षांत राज्य सरकारचे प्राधान्य असेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

राज्यात एकाच पक्षाने घवघवीत जागा जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी भारतीय जनता पक्षाला मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस कार्यक्रम न राबविता इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये रंगलेल्या या सरकारने राज्याला पिछाडीवर नेले.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते

Web Title: Devendra Fadnavis maharashtra government