मुख्यमंत्र्यांची आमदारकी जाणार?

टीम ई-सकाळ
बुधवार, 3 जुलै 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांनी या सर्व गुन्ह्यांची माहिती लपवली. त्यामुळे आता त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांनी या सर्व गुन्ह्यांची माहिती लपवली. त्यामुळे आता त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. 

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हांची माहिती दिली नाही. त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे याचिकाकर्त्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदारकी रद्द होणार की नाही, याबाबत आता 23 जुलैला न्यायालयाकडून निर्णय येण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis may Lost MLC