Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यापालांची घेतली भेट; काय आहे कारण?

Devendra fadnavis meet governor Bhagat Singh Koshyari maharashtra politics crisis
Devendra fadnavis meet governor Bhagat Singh Koshyari maharashtra politics crisis esakal

महिलांबाबत बेताल विधानं सहन करणार नाही. असं म्हणत विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. अशातच राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल. दरम्यान यासर्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Devendra fadnavis meet governor Bhagat Singh Koshyari maharashtra politics crisis )

महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.

दोघांच्यात चर्चा काय झाली हे अद्याप उघड झाले नसले तरी, मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच विद्यापीठ कायदेसंदर्भाती आदेशांबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले. तसेच, राज्यातील नेत्यांच्या बेताल विधाना संदर्भात यावेळी चर्चा झाली असल्याचेही समजते. राज्यपालांकडून यावेळी फडणवीस यांना काही सूचना करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

महिला नेत्यांनी राज्यपालांकडे गृहखात्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. राज्यातील सत्तेतीलच नेते महिलांविरोधात विधाने करत आहेत. अश्लील टिप्पणी केली जात आहे. त्यांना सरकारकडून साधी समज दिली जात नाही. गृहखात्याकडूनही या नेत्यांना समज दिली जात नसल्याचं या महिला नेत्यांनी राज्यपालांना सांगितल असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com