Kolhapur : हा योगायोग असूच शकत नाही ! कोल्हापूर प्रकरणात फडणविसांची शंकेची सुई कोणावर ?

अहमदनगरपाठोपाठ आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा
devendra fadnavis
devendra fadnavis

अहमदनगरपाठोपाठ आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झाला. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना कोल्हापुरातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यावर संशय व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची खोलवर चौकशी करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. (devendra fadnavis on kolhapur Satej Patil and Offensive Mobile Status Chhatrapati Shivaji Maharaj )

मागील महिन्यात कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘पन्हाळा, जयसिंगपूर येथील घटना, तसेच सोशल मीडियावरून फिरणारे संदेश पाहिल्यानंतर येत्या दोन-तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवले जाण्याची शंका व्यक्त केली होती. त्यानंतर काल शिवराज्यभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडली.(Latest Marathi News)

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संशयाची सुई अप्रत्यक्षपणे सतेज पाटलांकडे टोकावली आहे.

devendra fadnavis
Kolhapur : येत्या तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवलं जाण्याची शंका; सतेज पाटलांनी व्यक्त केली भीती

आम्ही हे खपवून घेणार नाही...देवेंद्र फडवीस

मला आश्चर्य असं वाटत की, कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणतात की मला माहितीय या ठिकाणी दंगल घडवण्यात येणार आहे आणि त्यानंतर काही तरुण औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उद्दत्तीकरण करतात. त्यानंतर प्रतिक्रिया येते. (Marathi Tajya Batmya)

या विधानाच आणि घटनाचा काही संबंध आहे का? अचानकपणे औंरगजेबाच उदात्तीकरण कोण करतय ? कोण यांना फुस लावतय? कुणाच्या सांगण्यावरुन हे घडत आहे ? काही गोष्टी आम्हाला समजत आहेत. पण चौकशी पुर्ण झाली की, त्याबद्दल मी पुन्हा बोलेन.

devendra fadnavis
Kolhapur Bandh : शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, आज कोल्हापूर बंदची हाक

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औंरगजेब आणि टिपू सुलतानच उद्दत्तीकरण होण हा काही योगायोग नाही. विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं की, दंगली घडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर विशिष्ट समाजाकडून औंरगजेबाच उद्दत्तीकरण होण हा योगयोग नाही. याच्या खोलवर जाण गरजेचं आहे. (Latest Marathi News)

हे विरोधी पक्ष एका भाषेत बोलत आहेत. एका विशिष्ट समाजाची लोक त्यांना प्रतिसाद देत औंरगजेबाच उद्दत्तीकरण करत आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही. हे चालणार नाही. हे महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे.

औंरगजेब कुणाला जवळचा वाटतो हे सर्वांना माहिती आहे. सगळे एकाचवेळी एकाच सुराच बोलतात आणि त्याला प्रतिसाददेखील मिळतो, हे कसं काय? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

devendra fadnavis
Kolhapur : छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; राजकीय नेत्यांनी कोल्हापुरातील जनतेला केलं 'हे' आवाहन

नगरमध्ये फोटो झळकला

दोनदिवसांपूरवी, अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. नगरमधल्या फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरुस निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरणूकीत काही तरुण हातात औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते.

devendra fadnavis
Kolhapur Bandh : 'ती' बातमी वाऱ्यासारखी आली आणि प्रचंड तणाव निर्माण झाला; रस्त्यावर सामसूम, दुकानं पटापट बंद

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. याप्रकरणी पोलिसांनी पोस्टर झळकावणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे तरुणांनी डिजेच्या तालावर नाचताना हातात औरंगजेबाचा फोटो घेतला होता. तसंच 'बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है' अशा घोषणाही दिल्या जात होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com