समुद्रात वाया जाणारे पाणी मराठवाड्यात वळवणार!

Devendra Fadnavis said that the state government will try to bring the water flowing from Konkan into the Godavari Valley to Marathwada
Devendra Fadnavis said that the state government will try to bring the water flowing from Konkan into the Godavari Valley to Marathwada

मुंबई -  कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. १५) व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला; तरीही गेल्या तीन-चार वर्षांत कमी पावसामुळे काही भागाने दुष्काळाचे संकट अनुभवले आहे. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसेच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा योजनेतून ४८० किमीचा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्‍चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतिमानतेने पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांत शेती क्षेत्रात सुमारे १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात आला. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात अनुसूचित जाती, जमाती, आदी सर्व वंचितांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या सूत्रानुसार सरकार चालवण्यात येत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या त्रिसूत्रीच्या आधारावर पुढील वाटचाल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी
राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी तिन्ही सैन्य दले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आदींनी प्रचंड मेहनत केली. पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पुनर्वसनासाठी ६ हजार ८०० कोटींचे पॅकज तयार केले असून विक्रमी वेळेत पुनर्वसन केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com