खडसेंप्रमाणे फडणवीसांनी राजीनामा द्यावा - विखे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

सिडको जमीन गैर व्यवहाराच्या चौकशीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. यात थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप होत आहेत. चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून एकनाथ खडसेंचा न्याय सिडको प्रकरणात लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली.

मुंबईची सिडकोची हजारो कोटींची जमीन कवडीमोल भावात बिल्डरांना देण्यात आली. जागेसंदर्भात मंत्रालयात किती बैठकी झाल्या, कोण त्या वेळी उपस्थित होते, हे चौकशीतून समोर येईल, असेही विखे म्हणाले. 

माफीचा प्रश्‍नच नाही : चव्हाण
नवनगर प्राधिकारणासाठी १९७२ मध्ये जमीन संपादनाचा आदेश काढण्यात आला होता. ही संपूर्ण जमीन सिडकोची आहे, असे आदेशात स्पष्ट आहे. ही जागा मोक्‍क्‍याच्या ठिकाणी असल्याने अनेकांचा डोळा आहे. दोन संस्थांनी या जागेची मागणी केली होती. जागा देत नसल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सिडको जमीन गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. यात तथ्य असल्याचे त्यांनीच मान्य केले आहे. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Web Title: devendra fadnavis should resign like eknath khadse says vikhe patil