पन्नास दिवसांचा त्रास हीच देशसेवा- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नगरः पंतप्रधानांनी नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी दिला आहे. देशाच्या सिमेवर आपले सैनिक जिवाची बाजी लावून लढत आहेत. ती देशसेवा महत्त्वाची आहे. तसेच नोटा बदलण्यासाठीचा 50 दिवस होणारा त्रास ही देशसेवाच आहे. प्रामाणिकपणे वागणे ही देशभक्ती आहे. गैरसोय झाली असली, तरी तिला सक्षमपणे तोंड द्या. थोडा त्रास सहन करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे.

नगरमध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नोटा बदलण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना हे आवाहन केले. या वेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, महापौर सुरेखा कदम उपस्थित होते.

''देशात आतंकवाद पसरविण्यासाठी, देशाची अर्थव्यवस्था बिघडविण्यासाठी पाकिस्तानच्या सरकार प्रेसमध्ये भारतीय चलनातील नोटा छापल्या जात होत्या. एकाच प्रेसमध्ये पाकिस्तानी व भारतीय चलनाची छपाई होत होती,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. राज्यातील पोलिस मुख्यालये ऑनलाईन केली असून, गुन्हेगारांचे ट्रॅकिंग आता एका क्‍लिकवर झाले आहे; तसेच पोलिसांना अत्याधुनिक घरे देण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: devendra fadnavis statement on black money