Devendra Fadnavis : मुश्रीफांच्या घरी पडलेल्या ईडीच्या धाडीवर फडणवीस, म्हणाले, मला... | Devendra Fadnavis statement on Hasan Mushrif house raid by ED | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : मुश्रीफांच्या घरी पडलेल्या ईडीच्या धाडीवर फडणवीस, म्हणाले, मला...

नगर - गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होत आहे. पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तर घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले की, मुश्रीफ यांच्या घरी पडलेल्या ईडीच्या धाडीबद्दल आपल्याला माहित नाही. माध्यमांमध्ये जे पाहिलं, तेच मला कळलं आहे. फडणवीस आज नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी अनेक बाबींवर मत व्यक्त केलं.

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झाल्यापासून तिथं एमआयएम पक्षाकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनावर फडणवीस म्हणाले की, नामांतर करण्यासाठी एक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन परत घ्यायलं हवं. शेवटी भारतामध्ये छत्रपती संभाजी राजांचाच उदो..उदो होईल. शांतता नांदण्यासाठी जे काही लागेल ते करू, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.