ओबीसीचे अर्धा टक्काही आरक्षण कमी केले जाणार नाही : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे आमदार डी.पी.सावंत यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्वाही दिली.

नागपूर : वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियात कोणत्याही समाजाच्या आरक्षणात कपात केलेली नाही. तसेच ओबीसींचे पूर्ण आरक्षण आहे. ते कमी केले नाही. त्याचे अर्धा टक्काही आरक्षण कमी केले जाणार नाही. त्यांच्यासाठी देण्यात येणारे  आरक्षण अबाधित राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे आमदार डी.पी.सावंत यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्वाही दिली.

प्रवेशामध्ये 70-30 चा फॉर्म्युला असतानाही त्यात बदल केला जात असल्याचा आरोप सावंत आणि राजेश टोपे यांनी केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यातील कोणत्याही आरक्षणात घट करण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले.

यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हरकत घेत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉसलेजची संख्या कमी आहे. त्यामुळे या मराठवाड्यातील मुलांवर अन्याय होण्याची शक्यता अधिक आहे. विद्यार्थ्यांनावर अन्याय होवू नये यासाठी सध्याच्या फॉर्म्युला तयार करण्याबाबत लवकरच बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

Web Title: Devendra Fadnavis talked about OBC reservation