भाजप सरकार कोसळले; देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा!

Devendra Fadnavis will resigns from Chief Minister post
Devendra Fadnavis will resigns from Chief Minister post

मुंबई : आज न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अजित पवारांनी मला भेटून अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. आता आमच्याकडे बहुमत उरले नाही. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही घोडेबाजार न करता आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आता मी राज्यपालांकडेल जाऊन राजीनामा देणार आहे. सत्ता स्थापन करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला स्थापन झालेले सरकार आज कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. 

फडणवीस म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिले. महाराष्ट्रात भाजपला सर्वांत जास्त जागा देऊन भाजपला जनादेश दिला. भाजपने लढलेल्या जागांपैकी 70 टक्के जागा आम्ही जिंकले. शिवसेना फक्त 40 टक्के जागांवर जिंकली. या जनादेशाचा सन्मान करण्यासाठी जनतेच्या मनातील सरकार बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण, जी गोष्ट कधी ठरलीच नव्हती. शिवसेनेला लक्षात आले की नंबर गेममध्ये आपली पॉवर वाढू शकते यामुळे त्यांनी तडजोड सुरु केली. जी गोष्ट कधीही ठरलेली नव्हती, म्हणजे मुख्यमंत्रीपद देण्याची ठरलेले नव्हते. अशा न ठरलेल्या बाबींचा बाऊ करून आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो, अशी धमकी भाजपला दिली. त्यावर भाजपने तात्विक भूमिका मांडून जे ठरले तेच देऊ असे म्हटले. ते आमच्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करू लागले.

मातोश्रीबाहेर न पडणारे लोक बाहेर पडले. विधानसभेची मुदत संपल्यानंतर आम्हाला राज्यपालांनी बोलविले आणि सत्ता स्थापन करा असे सांगितले. शिवसेनासोबत नसल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करू शकलो नाही. शिवसेनेने आपले हसू करून घेतले. राष्ट्रवादीही अपयशी ठरल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर 15 दिवस तीन मिळून चर्चा सुरु झाल्या आणि आम्ही सरकार स्थापन करू असे सांगू लागले. तीन पक्ष मिळून किमान समान कार्यक्रम तयार करत होतो. हा कार्यक्रम म्हणजे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच कार्यक्रम होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी सत्तास्थापनेत मदत करायचे ठरविले आणि त्यांनी आम्हाला पत्र दिले. आम्ही सरकार स्थापन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com