लोकशाहीच्या मंदिरात ठोकशाही सुरु - मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

शेतकरी कर्जमाफीसाठी निलंबनच काय कोणतीही कारवाई झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपला आपला लढा सुरूच ठेवेल.

मुंबई - सरकारने 19 आमदारांचे निलंबन करून लोकशाहीच्या मंदिरात ठोकशाही सुरु केल्याची जोरदार टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बॅनर फडकावणे, टाळ वाजवणे, घोषणाबाजी करणे, अध्यक्षांच्या सूचनांचे पालन न करणे, सभागृहाबाहेर अर्थसंकल्प जाळणे या प्रकरणी 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आणि काँग्रेसच्या नऊ आमदारांचा समावेश आहे.

या निलंबनानंतर मुंडे यांनी ट्विट करताना म्हटले आहे, की शेतकरी कर्जमाफीसाठी निलंबनच काय कोणतीही कारवाई झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपला आपला लढा सुरूच ठेवेल. लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही नाही, तर ठोकशाही सुरु आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमदार लढत असताना आमच्या आमदारांना निलंबित करण्यात आले.

Web Title: Dhananjay Munde criticize government on 19 MLA suspension issue