आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासण्यासाठी समिती नेमा : मुंडे

Dhananjay Munde
Dhananjay Munde

मुंबई : आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत केली.

आज (सोमवार) विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला, त्यावर मुंडे यांनी ही मागणी केली. जगातल्या प्रसिद्ध अशा 108 अर्थतज्ज्ञ व सांख्यिकी शास्त्रज्ञांनी मार्च 2019 भारतात सध्या जी अर्थविषयक आकडेवारी दिली जात आहे, ती वाढवून सादर केली जाते असे निवेदन केले होते. त्याचेच समर्थन करणारे विधान केंद्र सरकारने नेमलेले आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी केले होते. त्यांच्या मते सध्याचा भारताचा विकासदर अडीच टक्केने फुगऊन सांगितला आहे. 

आजचा आर्थिक अहवाल राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. त्यामुळे त्यातील आकडेवारीच्या खरेपणाविषयी संशय व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली. किमान नमुना पद्धतीने ही आकडेवारी वस्तुस्थितीला धरून आहे की नाही हे व्यापक जनहितार्थ तपासून पहावे अशी मागणी ही मुंडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com