रमेश कराड यांच्या माघारीने व्यथित: धनंजय मुंडे

सोमवार, 7 मे 2018

यामागे नेमकं कारण काय, याचा शोध घेवू. मात्र अशाप्रकारचे राजकारण होवू नये. 
कराड यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी राष्ट्रवादीने अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. जगदाळे यांचा विजय निश्चितच आहे.

मुंबई : रमेश कराड यांनी भाजप नाकारत असल्याने राष्ट्रवादीच प्रवेश केला. लातूरमध्ये राष्ट्रवादीला चांगला नेता मिळेल, यामुळे त्यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांच्या या निर्णयाने व्यथित झालो आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. 

यामागे नेमकं कारण काय, याचा शोध घेवू. मात्र अशाप्रकारचे राजकारण होवू नये. 
कराड यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी राष्ट्रवादीने अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. जगदाळे यांचा विजय निश्चितच आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी अनपेक्षितपणे उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादी तोॅडघशी पडली आहे. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश देत रमेश कराड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कराड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पंकजा  मुंडे विरूध्द धनंजय असा राजकिय संघर्ष पुन्हा एकदा या निवडणूकीत पहायला मिळणार होता. मात्र, आज रमेश कराड यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना अंधारात ठेवून आज उमेदवारी माघारी घेतली. या अकस्मात राजकिय करघोडीने राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा बसला असून यामागे नेमके कोणती कारणं आहेत यावरूव तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

Web Title: Dhananjay Munde statement on Ramesh Karad withdraw nomination