धनंजय मुंडे-सुरेश धस यांच्यात चकमक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नागपूर - एकमेकांच्या पक्ष कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिखलफेक केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व भाजपचे सुरेश धस यांच्यात परिषदेत चांगलीच शाब्दिक चकमक रंगली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मध्यस्थी करीत दोघांनाही विषयाला धरून बोलण्याच्या सूचना केल्या.

परिषदेत धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथ पंथी डवरी समाजाच्या पाच जणांच्या हत्येवरून कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेतही धस यांनी सोशल मीडियातील संदेशावरून राष्ट्रवादीला लक्ष्य केले. धस यांनी काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे घेत सोशल मीडियातून मुख्यमंत्री, मंत्र्यांना लक्ष्य केले जात असून, अनेकांची फेसबुकवर फेक अकाउंट असल्याचेही निदर्शनास आणून दिले. यावर धनंजय मुंडे संतापले. भाजपचे कार्यकर्तेही खालच्या पातळीवर फेसबुक आदी सोशल मीडियावर "पोस्ट' टाकतात. तुम्ही नावे घेणार असाल तर मीही घेतो, असे नमूद करीत मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नावे घेता येईल, असा इशाराच दिला. पंतप्रधान हे गौरी लंकेश यांच्या हत्येच्या समर्थन करणाऱ्यांना "ट्रोल' करतात, असे मुंडे यांनी नमूद करताच सत्ताधारी चिडले अन्‌ परिषदेत गोंधळ झाला.

Web Title: Dhananjay Munde Suresh Dhas Disturbance politics