झेडपी सदस्य ते कॅबिनेट मंत्री : धनंजय मुंडे यांचा प्रवास

दत्ता देशमुख, बीड
सोमवार, 30 डिसेंबर 2019

आक्रमक, हजरजबाबी, सर्वसमावेशक, अभ्यासू वक्तृत्व शैलीमुळे परिचित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

बीड : जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करबरे धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून छाप पाडणारी कामगिरी आणि पंकजा मुंडे यांचा 30 हजारांवर मतांनी प्रभाव केला. 

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जेष्ठ बंधू पंडितराव मुंडे यांचे चिरंजीव असलेले धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालेल्या धनंजय मुंडे यांना भाजप काळात युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही संधी मिळाली. तसेच विधान परिशदेवर देखील संधी देण्यात आली. 

दरम्यान, 2012 मध्ये त्यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला परळी मतदार संघात प्रभाव पत्करावा लागला. तसेच विधान सभेत देखील धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. नंतर, मात्र त्यांना पक्षाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून संधी दिली. 

Related image

पंकजा मुंडे यांच्यावर मोठा विजय

त्या माध्यमातून आक्रमक असलेले आणि तडाखेबाज भाषण करून त्यांनी सभागृह तसेच सभागृहाबाहेर सरकार विरोधात रान उठविले. मतदार संघात देखील जोरदार बांधणी केली. याचा परिनाम म्हणून नगर पालिका, जिल्हा परिषद/पंचायत समिती तसेच बाजार निवडणुकीत मतदार संघात राष्ट्रवादीने एकतर्फी यश मिळविले. या निवडणुकीत देखील त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर मोठा विजय मिळविला. 

आक्रमक, हजरजबाबी, सर्वसमावेशक, अभ्यासू वक्तृत्व शैलीमुळे परिचित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

मोलमजुरी ते मंत्रीपद - कुणाचा आहे प्रवास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Takes Oath As A Cabinet Minister Of Maharashtra Parali Beed Breaking News