Maratha Reservation : आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण: मुंडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास आज (गुरुवार) विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. हे आरक्षण मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षीय आमदारांचे आभार मानले.

मुंबई : आज विधानपरिषदेत सरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला मी व आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, या शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या.

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास आज (गुरुवार) विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. हे आरक्षण मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षीय आमदारांचे आभार मानले. मूळ आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यात करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज हा आराखडा सभागृहात सादर केला.

यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या सकल मराठा समाजाचे आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. 

Web Title: Dhananjay Munde talked about Maratha Reservation bill