मराठा समाजानंतर धनगर समाज आक्रमक

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक असतानाच धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मंगळवारी धनगर आरक्षण कृती समितीची पंढरपुरात बैठक पार पडली. यावेळी मागणी मान्य न केल्यास आषाढी एकादशीच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापुजेला विरोध करण्याची भूमिका असल्याचं, धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक आदित्य फत्तेपूरकर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवून श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला यावे. अन्यथा धनगर समाज मुख्यमंत्र्यांना विरोध करेल, असं आदित्य फत्तेपूरकर यांनी सांगितलं. मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. यासाठी पंढरपुरात बैठक बोलवण्यात आली होती.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे. याच अधिवेशनात धनगर आणि धनगड एकच आहे, असा ठराव करून केंद्र सरकारकडे अंमलबजावणीसाठी पाठवावा. अन्यथा मुख्यमंत्र्यांना विरोध करणार, असल्याचं आदित्य फत्तेपूरकर यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com