धनगर आरक्षणासाठी केंद्राला साकडे

धनगर आरक्षणासाठी केंद्राला साकडे

मुंबई - धनगर समाजाचा आदिवासी जातीत समावेश करता येणार नाही, असा अभिप्राय असलेला अहवाल अभ्यास गटाने दिलेला असला, तरी राज्य सरकार मात्र धनगर समाजाला आरक्षण देण्यावर ठाम आहे. धनगर समाजातील अनेक उपजाती आदिवासींपेक्षा मागास व आदिम असल्याचे संदर्भ देत राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती पत्र पाठवणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली.  

राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून धनगर जातीचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची विनंती करण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तांतराच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचा शब्द दिला आहे. 

राज्यातील धनगर या जातीच्या कुरमर, गवळी धनगर, सनगर, शेंगर, हाटकर या प्रमुख उपजाती आहेत. यापैकी अनेक उपजातींतले पुरावे सरकारने जमा केले असून, या जातीतले आदिवासीसदृश संदर्भ केंद्राला सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com