आरक्षणासाठी धनगर समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे - राज्य सरकारने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात केला नाही, तर राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर (एसटी) आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

विधान भवन येथे शुक्रवारी कृती समितीच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

राज्यव्यापी आंदोलन करण्यापूर्वी २४ ऑगस्टला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले जाणार आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भविल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा वडकुते दिला आहे.

समाजाच्या मागण्या
    धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा.
    सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे 
    समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यवसायासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये अनुदान द्यावे 
    आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
    समाजातील मुला-मुलींसाठी प्रत्येक तालुक्‍यांमध्ये स्वतंत्र वसतिगृह सुरू उभारावेत

Web Title: Dhangar Society Agitation for Reservation