BJP : भाजपकडून 'धन्यवाद मोदीजी' मोहीम! लाभार्थ्यांच्या नावे पत्र पाठवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

BJP : भाजपकडून 'धन्यवाद मोदीजी' मोहीम! लाभार्थ्यांच्या नावे पत्र पाठवणार

मुंबई : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपकडून 'धन्यवाद मोदीजी' मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्राच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या नावे भाजप केंद्राला पत्र पाठवणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मिशन-४५ ची घोषणा भाजपने केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती.

(Dhanyawad Modiji Scheme Latest Updates)

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी ४५ जागा जिंकण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवण्यात येणार आहे. केंद्राच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या नावाने मोदीजींना पत्र पाठवण्यात येणार आहे. तर या मोहिमेमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा: NIA पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये! संशयित PFIकार्यकर्त्यांना अटक

तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठीही भाजपने कंबर कसली असून मुंबई महापालिकेसाठी फिल्डिंग लावली आहे, गणेशोत्सवात अमित शाह यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. काहीही झालं तरी मुंबईचा महापौर भाजपचा झाला पाहिजे अशा सूचना दिल्यामुळे शिंदे गटाला युतीत असताना महापौरपदाचा उमेदवार मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे.