Vidhan Sabha : विलासरावांचे पुत्र धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र यावेळी निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. 

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र यावेळी निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. 

राज्यातील 52 विविध मतदारसंघासाठी उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये लातूर, वर्धासह इतर ठिकाणी काँग्रेसचे कोण उमेदवार असतील, याची माहिती देण्यात आली. यामध्ये पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून अरविंद शिंदे तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांच्या नावांचा समावेश आहे. वर्धा मतदारसंघातून शेखर प्रमोद शिंदे यांच्यासह काही जणांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. 

Vidhan Sabha : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी

दरम्यान, भाजपने आत्तापर्यंत 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पुण्यातील आठही उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेही आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. 

मनसेची पहिली यादी जाहीर; पुण्यातून चौघांना उमेदवारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dheeraj Deshmukh get Candidacy for Latur Rural Maharashtra Vidhan Sabha 2019