
Nitesh Rane: संजय राऊतांचं प्राणीप्रेम विशेष ! नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची उडवली खिल्ली
भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “संजय राऊतने माझ्या मालकाच्या मुलाचं लग्न का होत नाही, यावर अग्रलेख लिहावा”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान सामना अग्रलेखवरून संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे. कोणाला सापांची उपमा देणं हे वाईट नाही असं सामनाच्या अग्रलेखात लिहून आलं आहे. मी संजय राऊत आणि त्यांच्या मालकाला विचारेल की तुमचं प्राण्यांवर इतकं प्रेम आहे तर दुसऱ्यांना उपमा दिल्यावर तुम्हाला लगेच गुदगुल्या होतात. मी संजय राऊतला विचारेल तुझ्या मालकाच्या मुलाला बघून जेव्हा मी म्याव म्याव बोललो होतो तेव्हा तुझ्या मालकाला मिरच्या का झोंबल्या होत्या अशा शब्दात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.
तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी समजावं की हे तुमचं कार्ट तुमचं नाही आहे. तो मी तुमचे कपडे फाडतोय का हेच बघतोय, असंही ते म्हणालेत. संजय राऊतमुळे, त्याच्या भ्रष्टाचारामुळे पत्राचाळीतले लोक बेघर होत होते.बारसुला जाण्याआधी मालकाला घेऊन पत्राचाळीत जाऊन दाखव.कपडे फाडून तुला परत पाठवतील, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की मला दीड महीने खोट्या केसमध्ये आतमध्ये टाकलं होतं. त्याचबरोबर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. त्यांना मांजर म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या आवाजाची मिमीक्री करत टोला लगावला आहे.
तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या मालकाच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मुलाचं लग्न का होतं नाही त्यावर उद्याचा अग्रलेख लिहावा असंही ते पुढे म्हणाले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसमधुन बारसू येथील स्थानिकांवर लाठीचार्ज आणि गोळ्या झाडण्याचे आदेश दिले असं राऊत म्हणाले होते त्यावर राणे म्हणाले की, संजय राऊत त्या हॉटेलमध्ये गेले होते का? तिकडं काय काम करत होते का? राऊत तिथे कपडे धुण्यासाठी गेले होते का असंही राणे यांनी म्हंटलं आहे.
उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे षडयंत्र रचलं
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठकाही घेतल्या. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं, असा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे.