बाराशे डिझेल एसटी एलएनजी वर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार 
मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. 

डिझेल इंधन वापरल्याने देशाचे बहुमूल्य परकीय चलन खर्च होतेच. पण डिझेल गाड्यांचा देखभाल खर्च जास्त असून त्यासोबतच वायु, ध्वनी प्रदुषण होते. त्यामूळे पर्यावरण पुरक गाड्या चालवण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला आहे. 

या गाड्यांना डिझेलसह एलएनजी (लिक्विफाईड नॅचरल गॅस) प्लेट बसवण्यासाठी एसटीने नुकत्याच इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागितल्या आहे. त्यानूसार पहिल्या टप्प्यात 1200 गाड्या एलएनजी वर चालतील. मात्र, ज्या ठिकाणी एलएनजी मिळणार नसेल, त्या ठिकाणी डिझेलचा सुद्धा पर्यायी वापर करता येणार आहे. 

यापूर्वी पेट्रोलवर धावणाऱ्या गाड्यांना एलपीजी गॅस किट बसविण्यात आले आहे. तर डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांना सीएनजीचे किट बसविण्यात आले आहे. एसटीच्या ताफ्यातील डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांना एलएनजी बसविण्यासाठी पुढाकार घेणारे एसटी महामंडळ देशातील पहिली सार्वजनिक परिवहन महामंडळ ठरणार आहे. या निविदा प्रक्रीयेला प्रतिसाद देणाऱ्या कंपन्यांवरच गॅस किट बसविण्यासह गॅस पुरविण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे. 

एलएनजीचे फायदे 
एलएनजी लावण्यात आल्यानंतर गाडीचा आवाज येणार नाही. त्यासोबतच, वायु आणि ध्वनी प्रदुषन सुद्धा टाळता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diesel ST on LNG Maharashtra