वनमंत्र्यांच्या अडचणीत वाढ 

नेत्वा धुरी 
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

मुंबई : अवनी वाघिणीच्या हत्येमुळे देशभरातील पशुवैद्यकही राज्याच्या वन विभागावर संतापले आहेत. सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत वाघिणीला बेशुद्ध करणे नियमबाह्य असल्याचा आक्षेप पशुचिकित्सक महासंघाने नोंदवला आहे. या महासंघाने राज्याचे प्रमुख वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांना पत्र पाठवून जाब विचारला आहे. महासंघाच्या या पत्रानंतर राज्याच्या पशुवैद्यकीय परिषदेनेही या हत्येची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह संपूर्ण वन विभागाच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. 

वन्यजीवाला डार्ट देण्यासाठी प्रशिक्षित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने असणे बंधनकारक आहे. त्यासाठी डार्टिंग पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत होणे आक्षेपार्ह असल्याचे महासंघाने पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिकारी शाफत अली खान आणि त्याचा मुलगा असगर अली खान यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. अवनी व तिच्या पिलांना बेशुद्ध करण्याचे काम हे शिकारी शाफत अली खानला सोपवले गेले. 

अवनीची हत्या या पत्राची दखल घेत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेनेही आता या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. अवनीला हत्येपूर्वी कोणी डार्टिंग केले, संबंधित पशुवैद्यकीय होते का, शवविच्छेदन कोणत्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने केले, याबाबत आम्ही वन विभागाशी बोलणार आहोत. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आमच्याकडून कारवाईची दिशा ठरेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे सदस्य डॉ यशवंत वाघमारे यांनी दिली. 

कामानिमित्ताने बाहेर असल्याने कार्यालयात आलेले पत्र अद्याप पाहिलेले नाही. डार्टिंग आमच्या वनपालाने केले आहे. डार्टिंगसाठी आवश्‍यक प्रमाणाचे औषध पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अगोदरच बंदुकीत भरून ठेवले होते. त्याच बंदुकीतून डार्टिंग योग्य पद्धतीने झाले आहे. महासंघाचे पत्र माझ्या हातात आले की नक्कीच आम्ही उत्तर देऊ. 
ए. के. मिश्रा, मुख्य मानद वन्यजीव रक्षक आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 

डार्टिंगसाठी आवश्‍यक औषध हे ड्रग्सज ऍण्ड कॉस्मेटिक रुल्सच्या शेड्युल्ड एच किंवा एक्‍समध्ये मोडते. बेकायदेशीररीत्या हे औषधाचे डार्टिंग केलेली व्यक्ती ही शिक्षेस पात्र ठरते. वन विभागाने बेकायदेशीर व्यक्तींना डार्टिंगसाठी परवानगी दिल्याने आम्ही निराश आहोत. 
डॉ. चिरंतन कडिएन, अध्यक्ष, पशुचिकित्सक महासंघ 

Web Title: Difficulty increase for Forest minister