Vidhan Sabha 2019 : शिवसेनेची मोठी खेळी; आव्हाडांच्या विरोधात 'ही' अभिनेत्री रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

राष्ट्रवादीचे फायर ब्रँडनेते राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने मोठी खेळी केली असून, मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिला मुंब्रा-कळवा मतदारसंघातून आव्हाडांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात शिवसेनेने उतरवले आहे. दिपाली सय्यदने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिला शिवसेनेकडून कळवा-मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादीचे फायर ब्रँडनेते राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने मोठी खेळी केली असून, मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिला मुंब्रा-कळवा मतदारसंघातून आव्हाडांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात शिवसेनेने उतरवले आहे. दिपाली सय्यदने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिला शिवसेनेकडून कळवा-मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

Image result for dipali sayyad

मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तिने हातावर शिवबंधन बांधले आहे. जितेंद्र आव्हाडांना दिपाली सय्यद हिच्याकडून तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. उद्या (ता.03) दुपारी दिपाली सय्यद आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पवारसाहेबांसमोर मी नतमस्तक; आव्हाड भावूक

दिपाली सय्यद या पूर्वी शिवसंग्राम पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. नगर जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असलेल्या साकळाई पाणी योजनेसाठी दिपाली सय्यद आमरण उपोषणाला बसल्या होत्या. त्यांचे आंदोलन हे खूप गाजले होते. दरम्यान, आज (ता.03) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dipali sayyad contest vidhan sabha election in front of jitendra awhad