‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग ॲन्ड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

अभ्यासक्रमाविषयी
तारीख - १५ जुलैपासून (सोमवार)
अभ्यासक्रमाचे ठिकाण - एपीजी लर्निंग, सकाळ कार्यालय, प्लॉट क्र. ४२ बी, सेक्‍टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.

पुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा ‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू करीत आहे. ‘साम’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक नीलेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम होत आहे.

वृत्तवाहिन्या व डिजिटल मीडियाचे वाढते जाळे पाहता इंडस्ट्री रेडी वृत्त निवेदकांना व बातमीदारांना मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंगमध्ये करियर करण्यास मदत करणाऱ्या या अभ्यासक्रमात साम तसेच अन्य वृत्त वाहिन्यांमधील नामांकित निवेदक व बातमीदार मार्गदर्शनही करणार आहेत.

मूल्यमापनासाठी ६० टक्के प्रात्यक्षिके व ४० टक्के थेअरी अशी रचना असणाऱ्या या अभ्याक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना दोन महिने ‘साम मराठी’ या महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय वृत्तवाहिनीमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात येईल. प्रतिव्यक्ती शुल्क पन्नास हजार रुपये. 
संपर्क - ७३५०००१६०१


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diploma in News Anchoring and news reporting courses by sakal nilesh khare