विखे पाटलांवर भाजपत तर क्षीरसागरांवर सेनेत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.

मुंबई: नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.  
बाहेरून आलेल्यांना थेट मंत्रिपद देण्यामुळे भाजप सेनेत नाराजी आहे. विखे नेहमीच सत्तेत असतात त्यांना आता भाजपमध्ये संस्कारीत करावे लागेल असे उदगार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहेत. विखेंकडे कोणते खाते सोपवणार या बद्दल ज्येष्ठ मंत्री साशंक असली तरी निष्ठावंताना डावलून आयारामांना मंत्रिपद हा कुठला न्याय अशी भावना निष्ठावंतामधून व्यक्त होत आहे. सोबतच, क्षीरसागर यांच्या समावेशामुळे मराठवाड्यातील शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले आहे. विस्तारात विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली असल्यानेही मोठी नाराजी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disappointed bjp and sena leaders due to Vikhe Patil and jaydatta kshirsagar including in ministry