"शिवशाही' बसमध्येही अपंग प्रवाशांना सवलत 

"शिवशाही' बसमध्येही अपंग प्रवाशांना सवलत 

मुंबई - एसटी महामंडळाच्या वातानुकूलित "शिवशाही' बसच्या प्रवासभाड्यात अपंग व्यक्तींना 70 टक्के आणि त्यांच्या साथीदारांना 45 टक्के सवलत मिळणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी ही घोषणा केली. 

एसटी महामंडळाने सुरू केलेली "शिवशाही' बससेवा अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीची झाली आहे. राज्यभरात सर्व ठिकाणी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या बसमध्ये कोणालाही सवलत दिली जात नव्हती; मात्र लोकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांना भाड्यात सवलत देण्यात आली आहे. अंध आणि अपंगांना साध्या व निमआराम बसमध्ये 75 टक्के व त्यांच्या साथीदाराला 50 टक्के सवलत देण्यात येते. प्रवास भाड्यातील सवलत योजनेत आता वातानुकूलित "शिवशाही' बसचाही समावेश करण्यात आला आहे. 

एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यातील सवलतीचा लाभ घेणाऱ्या अंध आणि अपंग व्यक्तींची संख्या अंदाजे दोन लाख 82 हजार आहे. आता त्यांना "शिवशाही' बसमध्येही सवलत मिळणार असल्याने राज्य सरकारवर अतिरिक्त बोजा पडणार आहे. 

बसभाड्यात किती सवलत? 
साधी, निमआराम : अंध, अपंग- 75 टक्के; साथीदार- 50 टक्के 
"शिवशाही' : अंध-अपंग- 70 टक्के; साथीदार- 45 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com