अमित शहा - उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. 

मराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यानधे सविस्तर चर्चा झाली. शिवाय, 
राज्यसभा उपसभापती पदासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळावा. यावरही दोन्ही नेत्यानधे संवाद झाला.

दरम्यान, राज्य मंत्रीमंडळ विस्तार / फेरबदल यासह राज्यातील इतर राजकिय प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या सर्व मुद्द्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा लवकरच बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

Web Title: discussion between Uddhav Thackeray and Amit Shah