हवामानातील बदलामुळे साथीचे रोग 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील हवामान बदलामुळे साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, स्वाइन फ्लू रोखण्यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी व संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या आहेत. 

स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी आवश्‍यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी, तसेच आवश्‍यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता सरकारने दिली आहे. 

सध्या राज्यातील बदलते तापमान व त्यातील फरकामुळे स्वाइन फ्लूचे विषाणू पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्यात 60 टक्के शहरी भागात, तर 40 टक्के ग्रामीण भागात सध्या स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये विशेषतः बाहेरगावावरून आलेल्यांचा समावेश आहे. नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी- चिंचवड या जिल्ह्यांत प्रामुख्याने या विषाणूंचा प्रादुर्भाव असल्याचे आढळले आहे. 

2015 च्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लू आटोक्‍यात असला तरी राज्य शासन या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. 

स्वाइन फ्लूच्या विषाणूचा अटकाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, बुलडाणा, लातूर आदी जिल्ह्यांत पुन्हा सर्वेक्षण वाढविण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी प्रयोगशाळांचे शुल्क 2500 पर्यंत निश्‍चित करण्यात आले आहे. 

स्वाइन फ्लू विषाणूच्या प्रादुर्भावावर राष्ट्रीय विषाणू संस्था लक्ष ठेवून आहे. या विषाणूवर टॅमी फ्लू हेच प्रभावी औषध असल्याचे या संस्थेच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

- खासगी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेण्यास परवानगी 
- आवश्‍यकता भासल्यास स्थानिक पातळीवर औषध खरेदीस मान्यता 
- प्रत्येक जिल्ह्यात व्हेंटिलेटरची सुविधा 
- ताप, सर्दी, खोकला याकडे दुर्लक्ष न करता उपचार घेण्याचे आवाहन 

Web Title: Disease with climate change