विधान परिषद बरखास्त करा; आमदार गोटेंची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबई: विधानसभेने बहुमताने मंजूर केलेली विधेयक गोंधळ घालून विधान परिषदेत अडवली जातात, त्यामुळे राज्यघटनेतील 171 (1) तरतुदीचा वापर साध्या बहुमताने विधान परिषद रद्द करावी, अशी मागणी आ. अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आज (बुधवार) केली आहे.

विरोधकांची संघर्ष यात्रा सुरू झाली असून, विधानसभेतील सर्व विरोधी सदस्य रस्त्यावर उतरले आहे. विधानसभेने बहुमताने मंजूर केलेली विधेयक विधान परिदेत विरोधकांच्या बहुमताने अडवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आ. गोटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परिषद बरखास्तीची मागणी केली आहे.

गोटे म्हणाले, राज्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी विधान परिषदेची स्थापना झाली होती. सध्याची विधान परिषद म्हणजे जे लोक निवडणूक येत नाही, त्यांची सोय विधान परिषदेत केली जाते. विधान परिषदेच्या कामासाठी दरवर्षी 300 कोटी खर्च होतात. आमदार निधी दोन कोटींचा असून, वेतन आणि मरेपर्यंत विधान परिषद सदस्यांना पेन्शन मिळते. त्यामुळे हा निधी निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना वापरता येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The dismissal of the Legislative Council- anil gote