काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीच्या आधीच मतभेद

काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीच्या आधीच मतभेद

मुंबई : काँग्रेस पक्षात असलेले मतभेद विधानसभा निवडणुकीच्या आधीच उघड झाले आहेत. नाना पटोले यांच्या पोलखोल यात्रेवरून काँग्रेस पक्षातच नाराजी असल्याचे बोलले जात आहे. 

नाना पटोले यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी 
असल्याचे विदर्भातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. विदर्भातून नाना पटोले पोलखोल यात्रा सुरू करणार होते. यासंबंधी राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच समन्वय न ठेवल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. 

नाना पटोले हे प्रदेश पातळीचा निर्णय परस्पर घेत असल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे. पटोले महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रसिद्धीप्रमुख म्हणून सध्या काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवरही काँग्रेस नेते नाराज आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com