युतीचा तिढा 9 नोव्हेंबरला सुटणार?

वृत्तसंस्था
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्र्यांची भूमिका 'वेट अँड वॉच'ची

मुख्यमंत्री फडणवीस एकटे नाहीत

नाशिक : भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसल्याचे सध्या दिसत आहे. त्यानंतर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी युतीच्या तिढ्याबाबत वक्तव्य केले. युतीचा तिढा येत्या 9 नोव्हेंबरला सुटणार आहे. त्यामुळे आता फारशी काळजी करण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.

विदर्भ, मराठवाडा तसेच नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी महाजन बोलत होते. ते म्हणाले, सरकार स्थापनेविषयी 9 नोव्हेंबरपर्यंत कालावधी आहे. त्यामुळे फारशी काळजी करण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होईल. त्याबैठकीत निश्चितपणे तोडगा निघेल. कोणताही वाद राहणार नाही. सरकार स्थापनेचा निर्णयही तेव्हाच होईल, असेही ते म्हणाले. 

आमची भूमिका 'वेट अँड वॉच'ची

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत पक्ष आहे. दिवाळीत आठ दिवस मी त्यांच्यासोबत मुंबईतच होतो. सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत. सध्या आमची भूमिका 'वेट अँड वॉच'ची आहे. आता पुढचं चित्र लवकरच स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री फडणवीस एकटे नाहीत

मुख्यमंत्री एकटे नाहीत. आमचे पक्षाचे टीमवर्क आहे. आमची समिती कार्यरत आहे. सर्वजण मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेच्या घडामोडीत मुख्यमंत्री एकटे नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute of Shivsena BJP Alliance may Solve till 9 October says Girish Mahajan