District bank Election: प्रस्थापितांना पराभवाचा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District bank Election

District bank Election : प्रस्थापितांना पराभवाचा धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीत मतदारांनी विद्यमान मंत्री, दिग्गज आमदारांना पराभवाची धूळ चारली आहे. सातारा, जळगाव, सांगली, धुळे-नंदुरबार, लातूर, रत्नागिरी या जिल्ह्यांतील बँकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. आता अध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकांचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने बाजी मारली. २१ पैकी १७ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने विजय मिळविला. मात्र काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाला. भाजपला चार जागा मिळाल्या.

लातूर जिल्हा सहकारी बँकेत काँग्रेसच्या सहकारी पँनेलने बाजी मारली आहे. १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवला आहे. तर एका जागेवर देवचिठ्ठी काढून भाजपला विजय मिळाला आहे. मंत्री अमित देशमुख, त्यांचे बंधू धीरज देशमुख यांनी यश मिळविले. रत्नागिरी सहकारी बँकेत २१ पैकी २० जागांवर मंत्री उदय सामंत यांच्या पँनेलने विजय मिळवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धोबीपक्षाड मिळाला.

जळगावात भाजपचा धुव्वा ; धुळ्यात पाडवींचा पराभव

जळगाव मध्यवर्ती बँकेत २१ पैकी २० जागांवर महाविकास आघाडीने झेंडा रोवला आहे. यामुळे भाजपचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या मदतीने भाजपला धोबीपछाड दिला. भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताकदीला खडसे यांनी सुरूंग लावला आहे. धुळे-नंदुरबार सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल यांनी जोर लावला होता. तरीही सत्तेच्या चाव्या माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे राहणार आहेत. या ठिकाणी शरद पाटील, राजवर्धन कदमबांडे या माजी आमदारांनी बाजी मारली आहे. तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आदिवासी मंत्री के.सी.पाडवी यांचा पराभव झाला आहे.

loading image
go to top