जिल्हा बॅंकांना कर्जमाफीचा बाराशे कोटींचा फटका 

तात्या लांडगे  
मंगळवार, 12 जून 2018

सोलापूर : राज्यातील जिल्हा बॅंकांना कर्जमाफीमुळे फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे. 28 जून रोजी कर्जमाफीला वर्ष पूर्ण होत असून अद्यापही प्रक्रिया सुरूच आहे. त्यातच राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज घेऊ नये, असा फतवा काढला. त्यामुळे जिल्हा बॅंकांना सुमारे 1 हजार 200 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. 

नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळोवेळी अर्थसाह्य करणाऱ्या जिल्हा बॅंकांना कर्जमाफीचा फटका बसला आहे. तर मागील खरीप हंगामापासून बहुतांशी शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीच्या विलंबामुळे आता नियमित कर्जदारच थकबाकीत गेले आहेत. त्यामुळे बॅंकांचे कोट्यवधी रुपये अडकले आणि बॅंकांचा "एनपीए' पुन्हा वाढला. त्याचा फटका सोलापूर, नाशिक, बीडसह अन्य जिल्हा बॅंकांना बसला आहे. कर्जमाफीच्या विलंबामुळे बॅंकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे जिल्हा बॅंकांच्या पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सध्याची स्थिती 
31 
एकूण जिल्हा बॅंका 
20,000 कोटी 
कर्जमाफीची अपेक्षित रक्‍कम 
14,000 कोटी 
प्रत्यक्षात मिळालेली रक्कम 
6,000 कोटी 
मिळणारी उर्वरित रक्‍कम 
1,200 कोटी 
व्याजमाफीची रक्‍कम 

जूनपर्यंत दीड लाखांहून अधिक थकबाकीदारांनी रक्‍कम भरण्याची मुदत आहे. परंतु, अशा सुमारे 40 हजार थकबाकीदारांची यादीच बॅंकांना प्राप्त झालेली नाही. 
किसन मोटे, सरव्यवस्थापक, जिल्हा बॅंक 

Web Title: District banks liable to lapse of Rs.1 thousands 2 hundred crores of debt waiver