जिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. नव्या दुरुस्तीनुसार जिल्हा बॅंकांमधून बाराऐवजी यापुढे फक्त सातच प्रतिनिधी राज्य बॅंकेवर संचालक म्हणून निवडून येणार असल्याची माहिती राज्य बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. वार्षिक सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य बॅंकेवरील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आणण्याच्या दिशेने राज्य शासनाने ही खेळी केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

अनास्कर म्हणाले, की बॅंकेने सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या रचनेत्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यासाठी बॅंकेच्या उपविधीतील दुरुस्तीला सभेत मंजुरी देण्यात आली आहे. याआधीच्या संचालक मंडळात जिल्हा बॅंकांचे बारा प्रतिनिधी होते. त्यांची संख्या सातपर्यंत घटविण्यात आली आहे. प्रत्येक महसूल विभागातून एक अशी नवी रचना राहणार आहे. एक तज्ज्ञ संचालक जिल्हा बॅंकांतून मतदानाद्वारे निवडला जाईल. राज्यातील बहुतांश जिल्हा बॅंका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. याद्वारे राज्य बॅंकेवरही त्यांचीच सत्ता राहत होती. 

नागरी सहकारी बॅंकांमधून आता चार प्रतिनिधी नियुक्‍त होणार आहेत. साखर कारखाने, सूतगिरण्यांमधून एक प्रतिनिधी निवडला जात होता. त्यांची संख्या दोन इतकी करण्यात आली आहे. राज्यात गृहनिर्माण सहकारी संस्थांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांचा एकही प्रतिनिधी बॅंकेत नव्हता. त्यासाठी त्यांना एक जागा राखून ठेवण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंक आणि "नाबार्ड'च्या निकषांच्या आधारे बॅंकिंग आणि कृषी क्षेत्रातील दोन तज्ज्ञ संचालक मतदानाद्वारे बॅंकेवर येणार आहेत. 

गेल्या आर्थिक वर्षात राज्य बॅंकेचा निव्वळ नफा 201 कोटींवर पोचला आहे. यामुळे बॅंकेने भागधारकांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे. 
- विद्याधर अनास्कर, मुख्य प्रशासक, राज्य सहकारी बॅंक 

Web Title: District Bank's representation has been reduced