दिव्यांगजन पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई - दिव्यांगांच्या कल्याणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळास केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 3 डिसेंबरला नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले पुरस्कार स्वीकारतील.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अखत्यारीतील दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिव्यांग क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठीच्या दिव्यांगजन सशक्तीकरणासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार 2016 ची घोषणा नुकतीच करण्यात आली. राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळासोबत योग्य समन्वय ठेवून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळास उत्कृष्ट राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

सामाजिक न्याय मंत्री बडोले म्हणाले, की हा पुरस्कार मिळाल्याने दिव्यांगांसाठी आणखी चांगले काम करण्यास बळ मिळाले आहे. या पुढील काळातही दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी अधिक चांगल्या प्रकारे योजना तयार करून कार्य करण्यात येईल. या पुरस्काराने दिव्यांगांसाठी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

गेल्या दोन वर्षांत राज्यातील दिव्यांगाना कर्ज वाटप, राज्यस्तरीय साहित्य, कला व उद्योजकता संमेलनाचे नागपूरमध्ये यशस्वी आयोजन करून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यात आले. तसेच राज्यातील उद्योग क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या 13 दिव्यांग व्यक्तींना उद्योजकता पुरस्कार देण्यात आले, असे पुरस्कार देण्याची प्रथा बडोले यांच्या अध्यक्षीय काळात सुरू करण्यात आली; तसेच दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व त्यामार्फत विक्रीस चालना देण्याचे काम महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाने राज्याच्या महामंडळास 21 कोटी रुपयांचा निधी दिला. तसेच राज्यभर दिव्यांग स्वावलंबन मोहीम राबविण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील असून, त्याची सुरवात गोंदिया येथून झाली आहे. गोंदियातील सुमारे पाचशे दिव्यांगांनी या मोहिमेचा लाभ घेतला आहे.

Web Title: divyangjan award declare to maharashtra