ST Worker Strike : हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात? दिवाकर रावतेंचा घणाघात | Diwakar Raote | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwakar Raote,sanjay raut

विरोधकांकडे बोट दाखवायचं आणि यामागे आपले शत्रू आहेत का याची तपासणी करायची नाही हे योग्य

ST Worker Strike : हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात? दिवाकर रावते

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर झालेला हल्ला हा एक नियोजनबद्ध केलेला कार्यक्रम आहे. यामागे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा हात असण्याची शक्यता आहे. त्यांनी जी वक्तव्य केली यावरून हा हल्ला तेच घडवून आणत आहेत अशी शंका निर्माण होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी केली.आज संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती. त्याला दिवाकर रावते यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

दिवाकर रावते म्हणाले, संजय राऊत यांचे सरकार, त्यांचं पोलिस आहे. मग हल्ला झालाच कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या नेत्यांची सुरक्षा जे करू शकत नाहीत त्यांनी महाराष्ट्राच्या सुरक्षेचं हिताच्या गोष्टी, प्रबोधन करायच्या गोष्टी करू नयेत असाही टोला लगावला. पुढे ते म्हणाले, या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे अशी आमची मागणी आहे. विरोधकांकडे बोट दाखवायचं आणि यामागे आपले शत्रू आहेत का याची तपासणी करायची नाही हे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत

शरद पवारांच्या घरावरील हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हा भाजपचा नेता असून तो कुठं राहतो, कोणाच्या घरात राहतो, त्याला आर्थिक पाठबळ कोणाचं आहे याचा आम्ही शोध घेणार आहोत. सदावर्तेला फक्त पवारांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी तयार केलं गेलंय. कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसतो, हे सर्वांनाच माहितीय. शिवसेनेनं नेहमीच कामगारांची पाठराखण केलीय, पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे, असं त्यांनी म्हंटलंय.

Web Title: Diwakar Raote Criticism Sanjay Raut St Worker Strike

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top