एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मुंबई - एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली. कर्मचाऱ्यांना 2500 रुपये, तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना दहा टक्के इतकी अंतरिम वेतनवाढ देण्याचा तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही झाला आहे. 

रावते म्हणाले, एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या दहा टक्के इतकी अंतरिम वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ऑक्‍टोबर 2018पासून ही वेतनवाढ लागू होईल. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच अशी वेतनवाढ दिली आहे. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही वेतनवाढ देण्यात येणार आहे. याबाबत अभ्यास करून महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोनसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याबाबत या समितीस सूचित केले असून, त्यानंतर अधिकाऱ्यांना अंतिम वेतनवाढ दिली जाईल. तत्पूर्वी, या समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या दहा टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात येत असल्याचे रावते यांनी जाहीर केले. ऑक्‍टोबर 2018 पासून ही अंतरिम वेतनवाढ लागू होत असून, समितीच्या अहवालानंतर अंतिम वेतनवाढ लागू केली जाईल, असे मंत्री रावते यांनी सांगितले. 

महागाई भत्त्यातही वाढ 
एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली. ऑक्‍टोबर 2018 च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल. वेतनवाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच सुधारित झाले आहे. 

Web Title: Diwali gift to MSRTC employee